Friday, 15 June 2018

कुम्मटादुर्ग / गंडगलीकुमार रामना किल्ला कर्नाटक || gandugali kumara rama fort || Kummtadurg ||


कुम्मटादुर्ग / गंडगलीकुमार रामना किल्ला कर्नाटक   Gandugalli kumar rama fort video



 
गाव : जब्बालगुडा, तालुका / जिल्हा : कोप्पल, प्रकार : गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची : 725 मिटर.
Coordinates : 15°24'37.6"N 76°22'38.5"E



रायचूर-कोप्पळ रस्त्यावर जब्बालगुडा हे गाव लागते, जब्बालगुडा हे रेल्वे स्थानक आहे.
येथून उजवीकडे डोंगर रांगेत हा कुम्मटादुर्ग  म्हणजेच गंडगलीकुमार रामना किल्ला आहे.
किल्ल्याचे अगोदरचे नाव हे कुम्मटादुर्ग होते, नंतर त्याचे नामकरण शूर राजकुमार गंडगलीकुमार रामना याचा नावाने ठेवले गेले.




कच्चा मातीचा रस्ता किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जातो, येथून चढ्या वाटेने /. तासाने ट्रेक करत आपण गड माथ्यावर पोहोचतो.
गडाची तटबंधी हि  डोंगर रांग उतरते तशी खाली पायथ्यापर्यंत सर्वदूर आहे. डोंगर हा अवाढ्यव पसरलेला आहे तसाच माथा सुद्धा दूरवर पसरलेला दिसून येतो, त्याचा उपयोग गड निर्मिती साठी पुरेपूर करून घेतला आहे.\
किल्ल्यामंअधे अनेक पाण्याची नैसर्गिक टाक आहेत, त्यापैकी रामा स्वामी तलाव हा क्रिस्टल क्लिअर स्वच्छ सुंदर थंडगार कधीही ना संपणार पिण्याच्या पाण्याचं स्रोत आहे, यात उतरण्यासाठी लोखंडी शिडी बसवलेली आहे.
किल्ल्यामध्ये एकूण तीन मंदिर आहेत, पहिला मंदिर मध्ये अनेक दगडी शिल्प आहेत, दुसरा मंदिर जैन बसदी आज उध्वस्त अवस्तेत आहे, तिसरा हनुमान मंदिर उघड्यावर रामा स्वामी तलाव जवळ आहे.
बाल्लेकिल्ला हा मध्यवर्ती आहे, त्याची तटबंधी इमारतीचे अवशेष पाहता येतात, तसेच बाल्लेकिल्ल्याचा दगडी कमान नसलेला छोटा दरवाजा पूर्वेला आहे. या उंचीवरून सर्वदूर पसरलेला डोंगर रांगांवर पुरातन किल्ल्याचे अवशेष दिसून येतात.







कुमार रामण्णा चे वडील कंम्पलीया राया हे कुम्मटादुर्ग चे राजा होते.
कर्नाटक मध्ये विजयनगर कालावधी आधी १२९० ते १३२० हा मध्यवर्ती कालखंड गंडगलीकुमार रामना यांचा मानला जातो. शूर कुमारा रामण्णा यांनी अनेक लढाया लढल्या, प्रामुख्याने वारंगळ चे काकतीया ,होयासाला वीरबल्लाळास , मुह्हम्मद बिन तुघलक यांच्या सोबत लढलेल्या युंद्धांचा समावेश होतो.
या युद्धांपैकी तुघलक सैन्यांसबत लढत तरुण वयामध्ये शूर कुमारा रामण्णा यांचा मृत्यू झाला.
एक सुंदर अवाढव्य पसरलेला हा किल्ला अनेक लढाई युद्ध मध्ये लढलेला पाहण्यासारखं आहे.







याच किल्यावर २००६ साली कुमार रामण्णा जीवनावर वर आधारित एक कन्नड चित्रपटाचे निर्मिती झाली आहे.





आम्ही किल्ल्यावर गेलो असताना स्थानिक भाविक असा एक मित्रा समूह आला होता, त्यांचं तिथे जेवण बनवण्याचं काम चालू होत, चांगली माणसे होती, नेहमीसारखं त्यांच्याशी संवाद साधून स्थानिक माहिती घेतली.
त्यांनी जेवणाचं आग्रह खूप केला परंतु दुपारचं जेवणकरून हा गड सर केला होता पुढचा गडाकडे प्रवास वेळेचं नियोजनपूर्वक गणित चुकायला नको म्हणून इच्छा असून सुद्धा मानला आवर घालून निघालो.
नाहीतर ट्रेक करून झाल्यावर निवांत पणे निसर्गाच्या सानिध्य मध्ये, डोंगर माथ्यावर थंडगार हवा वाहत असताना गरमागरम जेवण तेपण नॉन_व्हेज  कोण ट्रेकर नाही म्हणेल नाही का?
Trekkers Journey

1 comment:

  1. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಕಮ್ಮಟ ದುರ್ಗ

    ReplyDelete