Sunday, 10 June 2018

शांतागिरी किल्ला कर्नाटक Shantagiri Fort karnatak


शांतागिरी किल्ला कर्नाटक   Shantagiri fort video 



गाव : शांतागिरी, तालुका : रोना, जिल्हा : गडग, समुद्रसपाटीपासून उंची : ६९५ मीटर. प्रकार : गिरिदुर्ग.
coordinates : 15°49'16.5"N 75°49'16.5"E
बदामी - गजेंद्रगड रस्त्यावर बदामीपासून २३ किमी वर डावीकडे शांतागिरी गाव लागते. रस्त्यावरूनच पूर्वेकडे एका डोंगरावर तटबंधी दिसून येते.
गावात SBI बँक आहे,, त्या मागूनच रस्ता जातो गावाच्या मागे पाण्याची टाकी मागून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे, परंतु हि पायवाट बकऱ्या चरण्यासाठी जातात म्हणून आहे. तेव्हा झाडीझुडपातून गड चढताना अंगावर येणारी चढ लागतो.




१५/20 मिनिटाच्या ट्रेक ने आपण एका उध्वस्त प्रवेशद्वारातून गडप्रवेश करतो.गड हा त्रिकोणी आकाराचा आहे.
तीन बाजूला तीन बुरुज त्रिकोणाच्या खालच्या बाजूला मधून प्रवेशद्वार अशी गडाची रचना आहे. फोटो मध्ये satelite image दिली आहे.
गडाचे तीन बुरुज पैकी दोन गोल तर मधला (त्रिकोणाचा वरचा ) बुरुज हा चौकोणी आहे. या भक्कम चौकोणी बुरुजाला जंग्या   झरोखे दिसून येतात. गड बांधकाम हे चुना ना वापरता केलं गेलं आहे.




पश्चिमेकडील बुरुज हा गोलाकार असून त्यामध्ये जाण्यासाठी थोडं कसरत करून गेलो कि बुरुज मधून १० पायऱ्या आहेत, त्याने आपण बुरुजाच्या माथ्यावर जाऊ शकतो.बुरुजावरून पूर्ण शांतिदूर्ग गाव दृष्टीक्षेपात येत.
गडाची तटबंधी खूप उंच लांब आहे, प्रवेशद्वार नसल्याने तेवढीच फक्त थोडी तुटलेली दिसून येते बाकी पूर्ण तिन्ही बुरुजांना जोडणारी उंच भक्कम तटबंधी आपल्याला पाहायला मिळते.
तटबंधी पुढे खोल खंदक आहे.




गडामधे एक बांधीव पाण्याचं टाक आहे तिला पाण्याची मोट पाट जोडलेली दिसून येते.



शांतागिरी दुर्ग हा जर नीट संवर्धन केले गेला तर बदामी पासून जवळच एक वैभवशाली पर्यटन आकर्षण होऊ शकतो.
Trekkers Journey

No comments:

Post a Comment