Tuesday, 12 June 2018

कोप्पल किल्ला कर्नाटक Koppal Fort Karnatak


कोप्पल किल्ला कर्नाटक     Koppal fort video


गाव / तालुका / जिल्हा : कोप्पल, प्रकार : गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची : 680 मीटर.
Coordinates: 15°20'23"N  76°8'55"E
कर्नाटकातील कोप्पल हे तीन बाजूनी डोंगरांनी वेढलेला ऐतेहासिक महत्वपूर्ण शहर, याच डोंगरांवर आहे प्रचंड भव्य कोप्पलचा किल्ला. कोप्पलला कोपणा नगर म्हणून सुद्धा ओळखले जायचे.



देवगिरी किल्ल्यासारखं थोडं हा किल्ला साम्य जाणवतो.
शहराच्या पश्चिमेला किल्ल्यावर जाण्याची पायरीमार्ग आहे.




किल्ला पुरातन आहे परंतु त्याचा इतिहास नष्ट केला गेला असावा. मराठ्यांच्या ताब्यात अगोदर हा किल्ला होता.
१७८६ मध्ये टिपू सुलतान याने पालेयागार कडून कोप्पल किल्ला हिरावून घेतला एका फ्रेंच इंजिनिअर कडून किल्ला मजबूत करून घेतला.
पुढे मे १७९० मध्ये ब्रिटिश निझाम सेनेने किल्ल्याला घेराव घातला.






पायऱ्याने चढत आपण किल्ला पाहतो, प्रत्येक मिनिटांवर अनेक दरवाजे, सज्जे, बुरुज दिसतात त्यामधून दिसणार निरनिराळे देखावे.






गडाला 7 भव्य दिव्य दरवाजे अनेक बुरुज आहेत. कडेला 3 तलाव,दगडाचा हुशारीने वापर करून बनवलेले तसेच अनेक नैसर्गिक पाण्याची टाकी, 1 देवी मंदिर, एक नाग शिल्प अप्रतिम असे सर्व पाहता येतात.


  



गणेश, शिवमंदिर आवर्जून पाहावं अस आहे, माथ्यावर अनेक बांधकामे आहेत,
वर फारशी शिलालेख आहेत,





कोप्पल पासून किमी वर असलेला बहादूर बंदी किल्ला दक्षिणेकडे सुंदर दिसतो
शहरात गायकवाड, माने, पवार, चव्हाण अशी सरदार मंडळी आज ही आहेत
3 तास गडफेरी साठी कमीतकमी लागतातच.





Trekkers Journey

No comments:

Post a Comment