Thursday, 7 June 2018

वल्लभगड किल्ला कर्नाटक Vallabhagad Fort


 वल्लभगड किल्ला कर्नाटक   Vallabhagad Fort Video



गाव : हरगापूर, तालुका : हुक्केरी, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची : ८१२ मीटर, प्रकार : गिरीदुर्ग. Coordinates:   16°16'47"N   74°27'37"E
किल्ले वल्लभगड,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासीक पार्श्वभूमी लाभलेला वल्लभगड. आपल्या दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे वल्लभगडावर दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या जातात.



कोल्हापूरहून बेळगावकडे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाने जाताना संकेश्वरच्या अलीकडे सुमारे कि.मी. अंतरावर डावीकडे हा गड दिसतो.
हरगापूर गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव, गाव तसे किल्ल्याला लागूनच आहे. गाडीमार्ग सिमेंट रस्ता थेट मरगुबाई मंदिर जवळ नेतो. मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी मिनिटांची पायवाट आहे.



मोठे बुरुज त्यातील एकावर चित्र काढलेले दिसून येते.गडाला प्रशस्त प्रवेशद्वार आहे, प्रवेशदारातून आत गेलं कि उजवीकडे हनुमान मंदिर आहे.
वल्लभगडावर मरगूबाई देवीचे मंदिर, हनुमान मंदिर शिद्राया मंदिर आहे. गडाला प्रशस्त प्रवेशद्वार आहे. गडाच्या माथ्यावर चाळीस फूट खोलीची विहीर आहे. विहिरीमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेला दुसरा छोटा भुयारी मार्ग किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या शिद्राया मंदिराकडे गेला आहे, असा लोकांचा समज आहे.



इतिहास :
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज कोकणातील जंजिऱ्याचे हबशी यांच्या फौजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणच्या गोव्याच्या सरहद्दीजवळ असणाऱ्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदत्ती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छ्त्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर सांकेतिक संदेश देणे सहज शक्य होत असे





ऎतिहासीक पार्श्वभुमी लाभलेल्या या वल्लभगडाला त्याकाळात अत्यंत महत्व होते. दख्खनवर स्वारी करण्यास शिवाजी महाराज ज्यावेळी येथून गेले. त्यावेळी उठलेल्या त्यांच्या कृष्णा घोडीच्या पाऊलखुणा त्या आठवणींना उजाळा देतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी दक्षिण सुभ्याचे प्रमुख होते. या गडावर ७५ शिलेदार होते, त्यांचे वंशज वल्लभगडावर आजही आहेत. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी या वल्लभगडाचे पुनर्बांधणी केली.. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती कोल्हापूरचे राजे होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड, पारगड कलानिधीगड हे किले जहागीर म्हणून दिले, १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा गड काही काळ निपाणीकर तर काही काळ वंटमुरी देसाई यांच्या ताब्यात गेला. कोल्हापूर हे संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेले असता त्यावेळी हा गड पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला.




गडावर पाहण्याची ठिकाणे.
) गडदेवी मरगूबाईचे देऊळ    ) शिवकालीन हनुमान मंदिर
) पेशवेकालीन महादेव मंदिर  ) सिद्धेश्वर मंदिर  ) शिवकालीन विहीर
) पेशवेकालीन हरिद्रादेवी मंदिर (किल्याच्या पायथ्याला पूर्वेला वल्लभगड गावात हे मंदिर आहे).




Trekkers Journey

No comments:

Post a Comment