Thursday, 24 May 2018

हुन्नर किल्ला कर्नाटक Hoonur fort karnatak


हुन्नर किल्ला कर्नाटक      Hoonur fort video


गाव :हुन्नर,तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव,समुद्रसपाटीपासून उंची 762 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
पुणे बंगळूर हायवे वर कोल्हापूर पासून ८७ किमी वर हिडकल जलाशय 3 बाजूनी पसरला आहे,


याच जलाशयाच्या एका बाजूला एका डोंगरावर हुन्नर चा किल्ला आहे. घाटप्रभा नदीवर हा जलाशय आहे.
 जलाशय मोठा असल्याने गडाच्या बाजूनी फक्त पाणी आहे.




हिडकल जलाशय राजा लखमगौडा यांनी बांधला असल्याने या जलाशयाला राजा लखमगौडा जलाशय नावाने हि ओळखतात.
गाडी रस्ता किल्ला पर्यंत जातो,खाली एक सर्किट हाऊस पर्यंत गाडी जाते तेथून 5 मिनिट मध्ये कमान नसलेल्या गोमुख दरवाजा मधून आपण गडावर प्रवेश करतो,




गोमुखी दरवाजा छान आहे त्याला 2 दिवड्या अप्रतिम आहे,
जांभ्या कातळात कोरून काढलेला हा दुर्ग, तटबंदी नैसर्गिक दगड आणि बांधीव करून मजबूत केली आहे.



एकर मध्ये गड आहे,1 बांधीव विहीर पाण्याचं टाकं आणि 1 प्रचंड खोल कोरीव विहीरझेंडा निशाणी बुरुज भक्कम आहे.
पश्चिमेला छोटा गोमुख दरवाजा  बुरुज अप्रतिम आहे,

 








हुन्नर गाव मधील धरण मध्ये गेलेलं मंदिर, कळस पाहून मन भरून जात, तटबंदी जमिनीलगत आहे खालून छान दिसते वरून दिसत नाही.
किल्ल्यावरून दृश्य अप्रतिम आहे.




No comments:

Post a Comment