Sunday, 8 April 2018

हुळी किल्ला कर्नाटक Hooli Fort Karnatak


हुळी किल्ला कर्नाटक   Hooli Fort Video     



गाव : हुळी, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 630 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
१०१ मंदिरांचं गाव म्हणजेच कर्नाटक मधील हुळी गाव, तालुक्याचं ठिकाण सौंदत्ती पासून फक्त १० किमी वर आहे.



बेळगाव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन जुनं असे हे गाव प्रसिद्ध आहे ते गावात असणाऱ्या १०१ मंदिरांमुळे, गावच नाव पूवळी म्हणजेच फुलांचे कानातील दागिने चा अपशब्द होऊन हुळी झालं आहे.
चालुक्य साम्राज्यातील खुणा दर्शवणारे अनेक मंदिर आजही दुर्लक्षित अवतेत आहेत.
गावात पोहोचताच किल्ल्याची चौकशी करत असता एक हुरहुररी तरुण विनोद रेड्डी हिंदी बोलणारा व खडान्खडा माहिती असणारा तरुण भेटला, तो स्वतःहून किल्ला दाखवायला आला.
दुर्ग दक्षिण डोंगरावर आहे  विनोद सोबत बोलता बोलता गडचढाईला सुरवात केली.
20 मिनिट मध्ये गड माथ्यावर पोहोचलो.




गडावर भग्न दरवाजा, तटबंदीला अखेरची गरगर लागली आहे, बुरुज अस्तित्व साठी झगडत आहे,
गड हा आता अतिशय बिकट अवस्थेत आहे, किल्ल्या हा लवकरच ढासळून पडणार आहे.
साधारण 1 एकर मध्ये गड असावा,7 बुरुज,1 बांधीव विहीर, 1 कोरीव टाक, हत्ती धोनी पाहावयास मिळतात.




20 मिनिट फेरी साठी खूप झाले.
खाली गावात तलावा जवळ अनेक मंदिरे आहेत, पुरातन अनेक काम दिसून येत.
मोठं मंदिर हे #पंचलिंगेश्वर मंदिर आहे, व #अंधकेश्वरा, #भवानीशंकारा, #कळमेश्वरा, #काशी_विशवनाथा, #मदनेश्वर, #सूर्यनारायण , #तारकेश्वर, #हुळी_ग्रामदैवत_संगमेश्वर_आज्जनांवरू, #बिरदेवार व अनेक अशी मंदिरे आहेत.



गावाबाहेरील ढाबा वर विनोद सोबत जेवण करून , पूर्ण १०१ मंदिर पाहण्यासाठी आरामात २ दिवस काढून भविष्यात येण्याचं ठरवून निघालो.
Trekkers Journey

नारगुंद किल्ला कर्नाटक Nargund Fort Karnatak


नारगुंद किल्ला कर्नाटक Nargund Fort Video


गाव
/तालुका : नारगुंड, जिल्हा गडग, समुद्रसपाटीपासून उंची 742 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
मजेशीर बाब अशी कि नारगुंद हा शब्द नारागुंद म्हणजेच कोल्ह्याच डोंगर वरून झाला आहे.





१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला  नारगुंद शहराच्या मागे डोंगरावर हा गिरिदुर्ग आहे. किल्ल्याला श्रीमंत इतिहास व प्रगल्भ असा वारसा आहे. किल्ल्याने अनेक लढाया पहिल्या आहेत.


१६६१ मध्ये औरंगजेब मुघलांनी हा किल्ला मराठ्यानकडून त्याब्यात घेतला,
१७०७ मध्ये रामराव दादोजी भावे यांच्या नेतृत्वाखाली,लढाऊ मराठ्यांनी मुघलांना धूळ चारत हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घेतला.
१७७८ मध्ये म्हैसूर च्या हैदर अली ने हा किल्ला त्याब्यात घेतला.
१८५७ मध्ये हा इंग्रजांकडे होता





नारगुंद किल्ला दक्षिण उत्तर पसरलेला आहे तसेच भौगोलिक पाहता गड हा इंग्रजी 8 आकड्यांचा आकाराचा गिरिदुर्ग आहे,
गडावर पवन चक्की असल्यामुळे गडावर गाडी जाते, 




2 बुरुज, 3 बांधीव टाकी, त्यात पूर्वेकडील हौद छान, आत पायऱ्या आहेत, दक्षिण बाजूस तटबंदी, हौद प्रेक्षणीय, उत्तर दिसेश 1 मंदिर पण कुलूप होत, मूर्तीमुख तेवढं दिसलं, पायथ्याशी 1 तलाव, गावात व्यंकटेश मंदिर प्रेक्षणीय, कोर्ट आहे, गावात मराठी माणूस पवार ,माने,चव्हाण आहेत.





Trekkers Journey