गाव : हुळी, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 630 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
१०१ मंदिरांचं गाव म्हणजेच कर्नाटक मधील हुळी गाव, तालुक्याचं ठिकाण सौंदत्ती पासून फक्त १० किमी वर आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन जुनं असे हे गाव प्रसिद्ध आहे ते गावात असणाऱ्या १०१ मंदिरांमुळे, गावच नाव पूवळी म्हणजेच फुलांचे कानातील दागिने चा अपशब्द होऊन हुळी झालं आहे.
चालुक्य साम्राज्यातील खुणा दर्शवणारे अनेक मंदिर आजही दुर्लक्षित अवतेत आहेत.
गावात पोहोचताच किल्ल्याची चौकशी करत असता एक हुरहुररी तरुण विनोद रेड्डी हिंदी बोलणारा व खडान्खडा माहिती असणारा तरुण भेटला, तो स्वतःहून किल्ला दाखवायला आला.
दुर्ग दक्षिण डोंगरावर आहे विनोद सोबत बोलता बोलता गडचढाईला सुरवात केली.
20 मिनिट मध्ये गड माथ्यावर पोहोचलो.
गडावर भग्न दरवाजा, तटबंदीला अखेरची गरगर लागली आहे, बुरुज अस्तित्व साठी झगडत आहे,
गड हा आता अतिशय बिकट अवस्थेत आहे, किल्ल्या हा लवकरच ढासळून पडणार आहे.
साधारण 1 एकर मध्ये गड असावा,7 बुरुज,1 बांधीव विहीर, 1 कोरीव टाक, हत्ती धोनी पाहावयास मिळतात.
20 मिनिट फेरी साठी खूप झाले.
खाली गावात तलावा जवळ अनेक मंदिरे आहेत, पुरातन अनेक काम दिसून येत.
मोठं मंदिर हे #पंचलिंगेश्वर मंदिर आहे, व #अंधकेश्वरा, #भवानीशंकारा, #कळमेश्वरा, #काशी_विशवनाथा, #मदनेश्वर, #सूर्यनारायण , #तारकेश्वर, #हुळी_ग्रामदैवत_संगमेश्वर_आज्जनांवरू, #बिरदेवार व अनेक अशी मंदिरे आहेत.
गावाबाहेरील ढाबा वर विनोद सोबत जेवण करून , पूर्ण १०१ मंदिर पाहण्यासाठी आरामात २ दिवस काढून भविष्यात येण्याचं ठरवून निघालो.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment