गाव :चचडी ,तालुका चौन्डत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 710 मीटर, प्रकार : भुईकोट.
12व्या शतकात बांधलेला हा भुईकोट आहे.
आपलं मराठी बेळगाव पासून ४५ किमी वर चचडी गावात सेनानी देसाई यांचा हा भुईकोट आहे.
स्वतः देसाई (श्री नागराज देसाई) भुईकोट दाखवायला आम्हला भेटले, आमचे नशीब.
चचडी गावात आलं कि देसाई वाडा विचारत आपण येतो. तटबंदी रस्त्याला लागूनच आहे. बाहेर एक बुरुज आहे, या बुरुजामध्ये गेलं कि आत मोठं मंदिर दिसून येत, मंदिरामध्ये मध्यभागी शिवलिंग तसेच डाव्या व उजव्या बाजूला दन मोठ्या मुर्त्या आहेत. बाहेरून बुरुज व आत छान हेमाडपंथी बांधणीच मंदिर एक अनोखं दृश्य पाहावयाला मिळालं.
या भुईकोटला 4 खनखणीत बुरुज, जंग्या,1बुरुज बाहेर त्यात मंदिर,3 अद्यावत दरवाजे, मोठं संग्रहालय आहे, गडात अप्रतिम आहे,, दुर्मिळ फोटो आहेत. एका फ्रेम मध्ये लोकमान्य टिळक व शाहू महाराज सोबत देसाई कुटुंबीय आहेत.
बेलवडी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रसंग मधील घराणं ते हेच, सुभापुर गिरिदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी नि बांधला तेव्हा सहकार्य याच भुईकोट मधून, अनेक कर्तबगार पुरुष जन्मला आलेलं कुटुंब, आवर्जून भेट द्या.
No comments:
Post a Comment