गाव : सुबापूर, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 830 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
देसाई वाडे किल्ला ताल्लुर पासून अवघ्या ४ किमी वर सुबापूर हे एक छोटा गाव आहे, या गावाच्या उत्तरेला डोंगरावर सुबापूरचा किल्ला आहे.
गावातून 15 मिनिट उभी चढाई करून किल्ल्याच्या भग्न दरवाजा पण शेजारील 2 अस्सल बुरुज स्वागत करतात.
किल्ल्याला एकूण 12 बुरुज आहेत, तटबंदी अजूनही शाबूत आहे, बांधीव 4 टाकी ,12 एकर मध्ये गड आहे, आत भग्न घरांचे अवशेष दिसतात, कोठारे आहेत. दक्षिण दिशेष दुहेरी तटबंदी आहे त्यातील आतील तटबंदीचे उंच अप्रतिम बुरुज आहेत.
गड फेरी साठी 30 मिनिट खूप झाले, तटबंदी प्रेक्षणीय आहे, दूरवर गावे रामपूर, सुमापूर दिसतात,गावात मराठी बोलणारी माणुसकी असलेली माणसे भेटतात
No comments:
Post a Comment