गाव :काकती, तालुका जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 802 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग
कोल्हापूर बेळगाव रस्त्यावर बेळगाव पासून अगोदर ६ किमी वर उत्तरेस असलेलं हा गिरिदुर्ग आपलं शेवटचं दिवस मोजत आहे,
काकती गावाच्या पूर्वेकडील डोंगर रांगेवर हा किल्ला आहे, हायवे वरून गड दिसतो. नवीन बांधलेल्या पायरीमार्गाने गडावर जाण्यासाठी 5 मिनिट लागतात,
कित्तूर राणी व स्वातंत्रसेनानी चेन्नम्मा यांचं जन्मस्थान असलेलं हे काकती गाव, असं म्हटले जात कि राणीच लहानपण या टेकडीवर गेलं.पुढे काकती पासून ४२ किमी वर असणार कित्तूरचे महाराजा मल्लासारजा देसाई यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं.
गडावर 3 अस्सल बुरुज,दुहेरी तटबंदी, पडकोट गोलाकार आहे ,तटबंदी शाबूत आहे, 2 बांधीव विहिरी आहेत, टेहळणीसाठी दुर्ग असावा,1 एकर मध्ये असेल, मागे दूरवर पवनचक्की आहेत.
No comments:
Post a Comment