गाव : ताल्लुर, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 678 मीटर, प्रकार : भुईकोट
बेळगाव पासून ६५ किमी वर ताल्लुर गावात देसाई भुईकोट म्हणून प्रसिद्ध आहे.
गावातून देसाई वाडे विचारात आम्ही आलो, तटबंधी पाहत पुढे आलो असता एका भव्य वाडयापाशी येऊन थांबलो.
देसाई यांचं नोकराने आम्ही आल्याची वर्दी आत दिली. स्वतः देसाई भेटले व आमची विचारपूस करून येण्याचं प्रयोजन समजून घेतले व वाडा पाहण्यास परवानगी दिली.
देसाई वाड्याबाहेर एक पुरातन मंदिर आहे परंतु आयात कोणतीही मूर्ती नाहीये, मोकळं मैदान व एक खोल वापरात असलेली मोटेची विहीर पाहून वाडा पाहायला निघालो.
1 एकर मध्ये हा अप्रतिम दुर्ग आहे, कोटला 4 खखणीत बुरुज, जंग्या, अप्रतिम वापरातील दरवाजा आहे.
आत स्वतः देसाई राजे राहतात आम्हला भेटले, फोटो सुद्धा काढले, पडकोट मधील जुने फोटो छान आहेत,
काही चित्र तर पाहण्यासारखे आहेत, दिवड्या, ओसर्या, बाहेर अतिशय खोल बांधीव विहीर, समोर वीरगळ, आहेत,
बुरुज मध्ये हनुमान कोरीव छान आहे.
No comments:
Post a Comment