Thursday, 24 May 2018

गोकाक किल्ला कर्नाटक Gokak Fort Karnatak


गोकाक किल्ला कर्नाटक   Gokak fort video


गाव / तालुका : गोकाक, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 742 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग/


कोल्हापूर पासून अवघ्या १०७ किमी असणारा कर्नाटक मधील गाव/तालुका प्रसिद्ध आहे तो त्याच्या गोकाक वॉटर फॉल्स, धागा गिरणी , हैड्रोइलेकट्रीकल पॉवर प्लांट साठी. गोकाक हे नाव हे यथे असणाऱ्या गोकी झाडापासून झालं असं म्हटलं जाते.

परंतु आधी हा आदिवासी/जंगली लोकांचं प्रदेश काळानुसार रट्टा साम्राज्य (850 Ad-1250Ad), बिजापूर सुलतानेत, टिपू सुलतान नंतर ब्रिटिश (१८१९) यांच्या अधिपत्याखाली होत. नंतर १८५३ मध्ये एक शहर झालं.
१६ व्य शतकात काही अंतर्गत वादामुळे एक मोठी लढाई राणी अब्बक्का गोकाक कोठवाल यामध्ये झाली.
त्याचा लढाईचा साक्षीदार असललेला गोकाक चा किल्ला शहराच्या पश्चिमेला आहे.



शहराला खेटून झोपडपट्टी चा विळखा पडलेला डोंगरावर हा गिरीदुर्ग उभा आहे, थोड्या दिवसात झोपडपट्टी गडापर्यंत गेलेली असेलच, नालायक पणा चा कळस आहेत
20 मिनिट चढाई, कोठून चढायचं हेच कळत नाही,हागणदारीतुन, झोपडपट्टी मधून डुकरांमधून रास्ता काढत,
पायवाटेने आपण वर येतो,
गडाचं प्रवेशद्वार हे नैसर्गिक दगड मध्ये बांधीव कमान असलेला दरवाजा मध्ये आहे.




मग दर्गा पुढे तटबंदी मग पुन्हा कमान नसलेला दरवाजा मग मोठा दर्गा,1 बांधीव टाक,12 एकर मध्ये गड आहे, तटबंदी चोहू बाजूने आहे पण जमिनीलगत आहे त्यामुळे वरून दिसत नाही, उत्तरेस घटप्रभा मार्कंडेया नदी पात्र आपल्या भोर जवळील नेकलेस पॉईंट सारख दिसत.





  


लवकर गड पाहून घ्या कारण स्थानिक जातीच्या राजकारणात गड हरवत चाललं आहे.


No comments:

Post a Comment