Monday, 9 April 2018

मनोल्ली किल्ला कर्नाटक Manolli Fort Karnatak


मनोल्ली किल्ला कर्नाटक     Manoli Fort Video
गाव : मनोल्ली, तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव,समुद्रसपाटीपासून उंची 604 मीटर, प्रकार :भुईकोट.


मुनावल्ली म्हणजेच मनोल्ली हे सौंदत्ती पासून २० किमी वर आहे.
गावातच शाळेजवळ किल्ला आहे, शाळे पासून आत जावं लागतं.



किल्ल्याला
सुसज्ज दरवाजा, खंदक, तटबंदी प्रेक्षणीय आहे,


पडकोट
ला फक्त 2 बुरुज दिसून येतात. हनुमान मंदिर खूप कोरीव काम अरुण बनवलेलं आहे
कोरीव शिल्प अफलातून आहेत, शकिर अप्पाचा बंगला आत गडात आहे, आत मध्ये अजून एक उडच्या देवी मंदिर छान आहे,
किल्ल्यामध्ये शिलालेख अप्रतिम आहे, नागशिल्प छान आहेत, गड 4 एकर मध्ये असेल.




 Trekkers Journey

सौन्दत्ती किल्ला कर्नाटक Saudatti Fort Karnarak


सौन्दत्ती किल्ला कर्नाटक  Saudatti Fort Video
 गाव/तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 702 मीटर, प्रकार : भुईकोट.
वेळ : सकाळी ते रात्री .

बेळगाव पासून ८७ किमी वर सौंदत्ती हे तालुक्याचं ठिकाण आहे.
सौंदत्ती तस प्रसिद्ध कारण रेणुका मातेच मंदिर,महाराष्ट्रामधून अनेक लोक दर्शनासाठी येत असतात.







सौंदत्तीच एतेहासिक नाव सुगंधीवती सौगंदीपुरा होत, बेळगाव ला स्थानांतर होण्यापूर्वी सौंदत्ती हे रट्टा राजघराण्याची राजधानी होत.
१८ व्य शतकातील हा किल्ला सिरसंगी देसाई यांनी बांधला.



गावच्या दक्षिणेकडे उत्तुंग असा खखणीत दुर्ग, दगड दगड आहे तसा आहे,उत्तम निगा राखली गेलेली तटबंधी
 बुरुज, जंग्या पाहण्यासारखं आहेत, किल्ल्याला गोमुख दरवाजा अप्रतिम भव्य आहे.



किल्ल्याला एकूण बुरुज असून किल्ल्यामध्ये वर कडासिद्धेश्वर मंदिर आहे.
मंदिरालापडकोटला वर बुरुज आहेत. मंदिराच्या सज्ज वर भौतिक प्रकारातील कोरलेलं २०० कलाकुसर आहे.



किल्यावर आगी मोहोळ आहे. काळसिद्धेश्वर मंदिर ओवऱ्या छान आहेत, तटबंदी प्रेक्षणीय आहे



Trekkers Journey


Sunday, 8 April 2018

परसगड/ येंद्रवी किल्ला कर्नाटक Parasgad Fort Karnatak


परसगडयेंद्रवी किल्ला कर्नाटक  Parasgad Fort Video


गाव : परासगड येंद्रवी , तालुका : सौन्दत्ती, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 830 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग.
सौदत्ती पासून अवघ्या  किमी वर १० व्या शतकातील परसगड येंद्रवीचा किल्ला आहे.




सौन्दत्ती ची यल्लपा देवी ही महाराष्ट्र आणि कर्नाटक ची आराध्य दैवत आहे, त्यामुळे हा गड प्रसिद्ध आहे, गाडी गडावर जाते,
दक्षिण पश्चिम डोंगर धारेवर असलेला हा किल्ला प्रसिद्ध रट्टा साम्राज्याने बांधला.
आल्यावर येण्यासाठी रस्ते आहेत, एक गाडीमार्गाने परसगड गावमार्गे दुसरा १०० पायर्यांनी येंद्रवी गावाने चालत.
 






किल्ल्यावर मोठं प्रवेशद्वार त्याला बुरुज आहेत, येंद्रवी गावामार्गे आलो कि अगोदर परशुराम टाक मंदिर लागत.
किल्ल्याला वर 12 ते 14 बुरुज, 2 सुसज्ज दरवाजे, तसेच पडकोटला 4 बुरुज,आहेत





किल्ला 100 एकर मध्ये असावा, पुढं थोडं चालत आलो कि दरी लागते, या दरीत उतरण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे, जपून चलावे लागते. दरीत गेल्यावर 1 टाक आणि भगवान परशुराम मूर्ती आहे, भाविक खूप असतात, गडमाथ्यवर पवनचक्की खूप आहेत.









Trekkers Journey