गाव/तालुका सौन्दत्ती, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 702 मीटर, प्रकार : भुईकोट.
वेळ : सकाळी ७ ते रात्री ८.
बेळगाव पासून ८७ किमी वर सौंदत्ती हे तालुक्याचं ठिकाण आहे.
सौंदत्ती तस प्रसिद्ध कारण रेणुका मातेच मंदिर,महाराष्ट्रामधून अनेक लोक दर्शनासाठी येत असतात.
सौंदत्तीच एतेहासिक नाव सुगंधीवती सौगंदीपुरा होत, बेळगाव ला स्थानांतर होण्यापूर्वी सौंदत्ती हे रट्टा राजघराण्याची राजधानी होत.
१८ व्य शतकातील हा किल्ला सिरसंगी देसाई यांनी बांधला.
गावच्या दक्षिणेकडे उत्तुंग असा खखणीत दुर्ग, दगड न दगड आहे तसा आहे,उत्तम निगा राखली गेलेली तटबंधी व
बुरुज, जंग्या पाहण्यासारखं आहेत, किल्ल्याला गोमुख दरवाजा अप्रतिम व भव्य आहे.
किल्ल्याला एकूण ८ बुरुज असून किल्ल्यामध्ये वर कडासिद्धेश्वर मंदिर आहे.
मंदिरालापडकोटला वर ४ बुरुज आहेत. मंदिराच्या सज्ज वर भौतिक प्रकारातील कोरलेलं २०० कलाकुसर आहे.
किल्यावर आगी मोहोळ आहे. काळसिद्धेश्वर मंदिर ओवऱ्या छान आहेत, तटबंदी प्रेक्षणीय आहे
Trekkers Journey
No comments:
Post a Comment