गाव : ऐहोळे ,तालुका :हुनागुंद, जिल्हा : बागलकोट, समुद्रसपाटीपासून उंची 610 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग.
ऐहोळे एक ऐतेहासिक कलेने समृद्धीने भरलेला गाव. जगप्रसिद्ध हंपी- बदामी पासून अवघ्या ३४ किमी वर ऐहोळे आहे.
ऐहोळे हे चालुक्या साम्राज्यवेळी राजधानी होती, हे शहर एक श्रीमंत व वैभवशाली, हिंदू सांस्कृतिक कलेचं केंद्र होत.
ऐहोळे मध्ये ४ ते १२ शतकमधील एकूण १२० दगडांचे व गुंफेतील प्रामुख्याने हिंदू, जैन व बुध्दीष्ठ मंदिरे आहेत,
Archaeological Survey of
India चा सर्वेक्षण ठिकाण असं हे ऐहोळे ५ किमी पर्यन्त पसरलेले आहे.
ऐहोळे किल्ला हा गावातून पूर्वेकडे गेल्यावर दिसतो या सर्व मल्लिकार्जुन मंदिर समुहामधून पुढे एका छोट्या डोंगरावर आहे
किल्ल्याला जाण्यासाठी एका रेषेत पायऱ्या आहेत,122 पायरी ने प्रथम 1 कोरीव लेणी (उपयोग ध्यानसाधनेसाठी केला जायचा) मग मुख्य गडावर आपण पोहोचतो.
किल्ल्यावर मेगुटी मंदिर, व किल्ल्याची गोलाकार तटबंधी, बुरुज वगळता काही अवशेष नाहीयेत.
बहुतेक मेगुटी मंदिर हे ऐहोळे मधील सर्वत प्राचीन आहे, एक शिलालेख आढळतो त्यानुसार पुलकेशी २ या काळातील एका कवी ने इसवी ६३४ मध्ये बांधले. चालुक्यस चा सुरवातीचा शिक्का आहे.
किल्ला 1 एकर मध्ये आहे, तटबंदी प्रेक्षणीय,2 गोलकर बुरुज, 4 मूर्ती, एक विहीर,1 मुख्य सदर,लेणी, कोरीव काम अफलातून आहे
संपूर्ण गावात अनेक प्राचीन काळापासून मंदिर आहे, दरवाजे अप्रतिम आहे.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment