Tuesday, 3 April 2018

मुदकावी किल्ला कर्नाटक Mudkavi Fort Karnatak

 मुदकावी किल्ला कर्नाटक    Mudkavi Fort Video




गाव : मुदकावी, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 620 मीटर, प्रकार : भुईकोट.
रामदुर्ग या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 किमी तर बागलकोट पासून ४९ किमी वर मुदकावी गावात हा किल्ला आहे. मुदकावी गावाच्या बस स्टँड समोर झेंडा/ध्व्ज बुरुज आहे,



तस पाहिलं तर अर्ध गावच मुख्य गडात आहे सरकारी शाळेची इमारत किल्ल्याच्या तटबंधी मधेच आहे.
किल्ल्याचा ऐतिहासिक घटना किंवा उल्लेख मी शोधण्याचं प्रयत्न करतोय.
साधारण 85 एकर मध्ये गड, 14 बुरुज, तटबंदी प्रेक्षणीय,2 प्रवेशद्वार मुख्य गडाला, त्यातील एक नव्यने तर दुसर तलाव बाजूच अप्रतिम आहे,तलावासमोर बुरुज तटबंधी आहे. किल्ल्यामध्ये एक खुलं मंदिर त्यासमोर एक दीपमाळ आहे.




पडकोट छान आहे त्याला  सुसज्ज दरवाजा, खांबाला एक कोरीव शिल्प, 1 अतिदेखण बुरुज त्याच्या जंग्या मनात घर करून जातात, त्यावरील शरभ तर भन्नाट,1 एकर मध्ये पडकोट आहे, चोर दरवाजा,1 विहीर, मंदिर,सदर अवशेष आहे,
महाकाय गड आहे, तटबंदी प्रेक्षणीय आहे,







एक महत्त्वाचे गावात इरकल साडी कारखाने घरगुती खूप आहेत, घरगुती असल्याने ते खूप स्वस्त भावात विकतात आणि महत्वाचे म्हणजेच सुंदर साड्या बनवतात (हे नंतर घरून फीडबॅक मिळालं तेव्हा समजलं),
घरगुती अश्या मेहनतीच्या कामांना प्रोस्थाहन देणे हे आमचं स्वभावच  म्हणून साडीमधील काही कळत नसून सुद्धा सुद्धा साडी खरेदी केली गेली.



Trekkers Journey

No comments:

Post a Comment