गाव:मुदगल, तालुका लिंगसुर, जिल्हा रायचूर, समुद्रसपाटीपासून उंची 600 मीटर, प्रकार : भुईकोट/गिरिदुर्ग.
लिंगसुर पासून १९ किमी वर तर जगप्रसिद्ध बदामी पासून १०० किमी वर मुदगल किल्ला आहे.
किल्ल्याच इतिहास देवगिरीच सेऊना यादव (850–१३३४) पर्यंत जातो, कारण मुदगल मध्ये अनेक प्राचीन अवशेष व साहित्य याचे पुरावे मिळतात.
११ व्या शतकात मुदगल हे देशातील एक शैक्षणिक केंद्र होत, तर १४ व्या शतकाच्या सुरवातीला काकटिया साम्राज्यच एक शहरबाहेरच प्रमुख सैनिकी ठिकाण होत.
देवगिरी वर ताबा करताना अल-उद-दिन-बहामान-शाह याने रायचूर सोबत मुदगल ताब्यात घेतले.
१६ व्या शतकामध्ये मुदगल वर विजयनगर साम्राज्यच राज्य होत. वीजततनगर चे आहे कृष्ण देवराया यांनी रायचूर विजापूर मध्ये घेतल्यानंतर मुदगलला सामील करून घेतलं.
कन्नड मध्ये पारंपरिक एक गीत मुदगल वर सुद्धा आहे "ಆ ಕಲ್ಲ ಈ ಕಲ್ಲ ಹಚ್ಚ ಹಳದಿ ಕಲ್ಲ ಇಳಕಲ್ ಅದರ ಮುಂದಿರುವ ಮುತ್ತಿನ ಕಲ್ಲ ಮುದ್ಗಲ್" (ज्यांना कन्नड येते त्यांनी वाचा :)
किल्ला एक अप्रतिम भुईकोट तसेच छोटा गिरिदुर्ग पण आहे, किल्ल्याभोवती मोठं खंदक, महाकाय 3 गोमुख दरवाजे, दिवड्या व त्यावर कोरीव मूर्ती आहेत, दिवड्या च्या खांबाला अनेक कलाकुसर दिसून येते, बुरुज तर अप्रतिम, जंग्या, चर्या बेस्ट, लाकडी दरवाजे अजून सुस्थितीत आहेत, कोरीव हनुमान तटबंदी मध्ये आहे.
अर्ध गाव भुईकोट मध्ये आत राहत, दुसरा पश्चिम दरवाजा हा सुद्धा भारी आहे, त्यावर 1 तोफ आहे,
दक्षिणेस नैसर्गिक दगड चा बुरुज केलेत छान आहे,
साधारण 150 एकर मध्ये गड आहे,तटबंदी अजून छान आहे,उत्तर बुरुज मध्ये आगळी वेगळी स्टीचिंग केल्यागत 1 तोफ तर दुसरी छोटी आहे पण अडचणीत आहे, पण आपल्याला अडचण कसली पहायची म्हणजे पाहणारच,
जवळपास 40 अवाढव्य बुरुज, तलाव आहे, हिंदू मंदिर, मजीद आहे.
किल्ल्याचा माथा 2 भाग मध्ये आहे, वर अनेक मोठे दगड व त्यांनाच पुरेपूर वापर करून बुरुज व प्रवेशदार , इमारती बांधण्यासाठी केलेला अवशेष पाहताना दिसून येतो.
पहिल्या बुरुजावर जात येत पण 1 आगी मोहोळ आहे बुरुज ला वर जाताना काळजी घ्यावी.
Trekker Journey
No comments:
Post a Comment