गाव :तोरगळ, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 570 मीटर, प्रकार : भुईकोट.
कर्नाटक राज्यातील तालुक्याचे ठिकाण रामदुर्ग पासून १२ किमी वर १०० एकर मध्ये तोरगळ गाव हे तोरगळ किल्ल्यामध्येच वसलेले आहे. किल्ला हा पिवळ्या व लाल शहाबादी दगडांनी बनवलेला आहे.
इसवी ११०० मध्ये हा किल्ला राजा भुताश्या याने बांधला असे म्हटले जाते,
इतिहासाची पाने उलगडताना तोरगळ किल्ल्यावर शिंदे घरांच्या ९ पिढ्यानी राज्य केले दिसून येते.
शेवटचे राजे नरसोजीराव शिंदे हे तोरण जहांगीर १९३२ - १९४९ पर्यंत होते, नंतर किल्ला भारतीय प्रजासत्ताक मध्ये सामील झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यविस्तार करताना आपाजी सुरो, मालोजी मीरासाहेब भोसले व विश्वासू अधिकारांसोबत १२ मावळ्यांच्या सैनिकी तुकड्या दक्षिण दिग्विजय साठी पाठविल्या,
मावळ्यांनी तोरगळ घेऊन तिथे थांबा केला व पुढे तोरगळ ला दक्षिण दिग्विजय चा मध्यवर्ती ठिकाण केलं.
मावळ्यांनी तोरगळ घेऊन तिथे थांबा केला व पुढे तोरगळ ला दक्षिण दिग्विजय चा मध्यवर्ती ठिकाण केलं.
किल्ल्यामध चालुक्य कलाकुसर दिसून येत
किल्ल्याला अगोदर ४ प्रवेशद्वार होते त्यातील आता एकच वापरात आहे.
प्रमुख प्रवेशद्वारला 3 अप्रतिम दरवाजे आहेत,मलप्रभा नदी किनारी हा दुर्ग आहे.4हजार लोकसंख्या गाव, आतच आहे, दुहेरी तटबंदी आहे, एका बाजूला खंदक आहे, पश्चिम बुरूज वर तुटलेल्या अवस्थेतील तोफ आहे,26 बुरुज आहेत, त्यातील 2 लय भारी बुरुज आहे, जंग्या,100 एकर मध्ये गड आहे, शिंदे पॅलेस छान आहे त्यात 1 तोफ आहे,दुर्ग देवी मंदिर आणि मराठी माणूस आहेत.
No comments:
Post a Comment