गाव : सिरसंगी, तालुका: सौंदत्ती,जिल्हा: बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 602, प्रकार : भुईकोट.
तालुक्याचे ठिकाण सौंदत्ती पासून २३ किमी वर सिरसंगी गाव आहे,
सिरसंगी तसा १४ व्य शतकातील कालिका देवी मंदिरामुळे आहेच पण याच गावात सिरसंगी वाडे म्हणून ओळखले जाणारा सिरसंगी चा किल्ला पण आहे.
श्री त्यागवीर लिंगराज देसाई यांचं हा किल्ला, इथे त्यागवीर लिंगराज देसाई न्यायनिवाडा करीत असत.
छोटा भुईकोट असावा तर असा, चौकोणी असा देखणा गड आहे, चार बाजूला 4 अभेद्य बुरुज, जंग्या, चर्या, महाकाय दरवाजा जस काय उद्या लढाई केली तरी तयार आहे,
पडकोटला लाकडी कलाकुसर, उत्तम निगा राखली गेली आहे. सर्व ठिकाणी स्वच्छता आहे. चारही बाजूचे उत्तम बुरुज व त्याला सर्व बुरुजांना जोडणारी तटबंधी अप्रतिम.
किल्ल्यामध्ये एक शिवमंदिर आहे, किल्ल्यामध्ये एक दुमजली लाकडी इमारत ज्यावर जाण्यासाठी अरुंद बोळ दगडी पायर्यांनी बनले आहेत.
असा स्वतःचा पडकोट असावा असे उगाच वाटून गेले :)
Trekkers Journey
Trekkers Journey
No comments:
Post a Comment