Thursday, 29 March 2018

जलदुर्ग किल्ला कर्नाटक Jaldurg Fort Karnatak

जलदुर्ग किल्ला कर्नाटक



गाव : जलदुर्ग ,तालुका लिंगसुर, जिल्हा रायचूर, समुद्रसपाटीपासून उंची 495 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
क्यादिगेर किल्ला पाहून रात्री लिंगसुर मठात राहून सकाळी लवकर उठलो व पुढचा प्रवासाला निघालो.
लिंगसुर पासून १९ किमी वर कृष्णा नदीच्या काठावर आणि नारायणपूर धरण च्या पाणी सोडतात त्या संगम वर हा अभेद्य गड उभा ठाकला आहे. जलदुर्ग गावात अनपेक्षरीत्या सकाळी पुलाव व चटणी मिळाली, ५०/६० घरे नसतील पण गावात २ चहा नास्ताचे हॉटेल. विचारणा केली असतात, सकाळी सर्व लोक कामाला दूर जातात व येताना उशीर होतो मग कामगारांना सकाळी लवकर उठून खाणे करणे शक्य होत नाही म्हणून १२ रुपयांचा पोटभर पुलाव चटणी खाऊन व तेच पार्सल घेऊन जातात.



विजापुराच्याअदिलशाहींनी हा गड बांधला असे म्हटले जाते. कन्नड मध्ये याला पाण्यावरचा किल्ला म्हटले जाते कारण ३ बाजूने पाणी व खोल दरीमध्ये वाहणारी कृष्ण नदी.
इंग्रजी अक्षर Y आकाराचा हा गड आहे, किल्ल्याचे 100 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल, सुरुवातीला चोकोणी बुरुज दिसतात व नंतर गोलाकार, किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. त्याला काही गोलाकार बुरुज आहेत, दरवाजा सुस्थितीत आहे,, पहिल्या टप्प्यात 2 घरे, मारुती मूर्ती,2 ते 3 लहान मंदिरे, रथ आहे, मग सिमेंट रस्ता ला एक दरवाजा सुस्थितीत आहे, दिवड्या छान, मग परत एक गोमुख दरवाजा दिवड्या,1 घर, मंदिर मोठं आहे, लोक राहतात, विहीर आहे,1 उंच इमारत,1 खोली, बुरुज अप्रतिम आहे, तटबंदी प्रेक्षणीय आहे.




असे म्हटले जाते कि किल्ल्यावर आधी एक तळमजला असणारे राजमहाल  होते. किल्ल्यावर काही नावे नसलेल्या समाधी आहेत,सांगितलं जात कि त्या समाध्या राजांच्या आहेत. किल्ल्यावर संगमेश्वर मठ , यल्लमा माता मंदिर आहे




जलदुर्गामध्ये एक शिलालेख आहे त्यावर एका बाजूने उर्दू तर दुसऱ्या बाजूला देवनागरी मध्ये लिहलेले लेख आहे.
स्थानिक म्हणतात कि नदीच्या पात्रामध्ये दगडी बॉक्स आहेत, त्यात बसवाना महाराजांच्या लिखित ओली आहेत ज्यावर जगाच्या रहस्य बद्दल माहिती आहे.





पावसाळ्यात या गडाचं सौंदर्य अप्रतिम असणार यात शंका नाही, तिन्ही बाजूनी पाणी, हिरवेगार चढ उताराचे डोंगर, शहरापासून दूर.
 राहण्याची सोय मठ किंवा गडावर राहू शकतो.

No comments:

Post a Comment