Video : https://youtu.be/HELyNRtkaC4 bidar fort video
किल्ल्याला तिहेरी तटबंधी असून मध्ये मोठे खंदक आहेत.
कर्नाटकातील बिदर शहर व किल्ला एका पठारावर वसलेले असून समुद्र सपाटीपासून उंची ६७० मीटर आहे.
हा किल्ला एवढा मोठा पसरलेला आहे कि लांबीला 1.२ किमी तर रुंदीला 1 किमी असा भव्य पसरलेला आहे
१५ व्य शकतील हा किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे, तुघलक , सुलतान, मुघल , निझाम असे अनेक राजवटी पाहत हा किल्ला त्यापरमाने बदलत गेला.
किल्ल्याला तिहेरी तटबंधी असून मध्ये मोठे खंदक आहेत.
किल्ल्याला ७ दरवाजे आहेत , १)प्रमुख दरवाजा म्हणजेच मांडू दरवाजा २) कालमडगी दरवाजा 5)दिल्ली दरवाजा 6)कल्याणी दरवाजा 7)चरणांतिक दरवाजा . तिसऱ्या व चवथ्या दरवाज्याला नाव नाहीत.
किल्ल्याला ३७ बुरुज व तेवढ्याच तोफा आहेत.
तत् मुंडा बुरुज हा महत्वाचा बुरुज आहे व त्यावर सर्वात मोठी अशी तोफ ठेवली आहे.
किल्ल्यामध्ये खूप अवशेष असून त्यातील प्रमुख असे रंगीन महाल, तखत महाल, जामा मज्जीद व १६ खांब मज्जीद आहेत .
किल्ल्यामध्ये जुनी पर्शियन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम कारेझ हे एक अदभूत असे वॉटर सप्लाय सिस्टिम आहे.
किल्ल्यामध्ये आत एक संग्रहालय आहे, त्यात अनेक राजवटीचे जुने अवशेष पाहण्यास मिळतात.
किल्ल्याच कलाकुसर , भव्यता , फ्रेस्कोइड कॅलिग्राफय पाहण्यासारखी आहे.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment