गाव/तालुका/जिल्हा : विजापूर, समुद्रसपाटीपासून उंची 600 मीटर, प्रकार: भुईकोट
विजापूर किल्ला, लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं नाव, तस विजापूर जिल्हा हा हिंदू आणि इस्लामी वास्तुशिल्पकला यांचे ठाण मानण्यात येतो.
विजापूर नावाविषयी इतिहासज्ञांत एकवाक्यात नाही, तथापि कोरीव लेख, संस्कृत-कन्नड-फार्सी साहित्य यांतून विजयपूर, राय राजधानी, दक्षिण वाराणसी, बिज्जनहळ्ळी, बिज्जपूर, मुहम्मदपूंर इ. भिन्न नामांतरे आढळतात. पूर्वी या जागी सात खेडी होती व तेथेच यादवांनी हे नगर वसविल्याचे सांगितले जाते. या सात खेड्यांपैकी बिजनहळ्ळी खेड्यावरून या नगराला विजापूर हे नाव पडल्याचे म्हणतात. नगराच्या परिसरातील काही देवालयांत चालुक्य व यादव वंशातील राजांचे शिलालेख आहेत. आर्क किल्ल्याच्या पूर्वद्वाराजवळील विजयस्तंभाताल लेखात विजयपूर असा स्पष्ट उल्लेख आहे. हा स्तंभ सातव्या शतकातील असावा, असे तज्ञांचे मत आहे.त्यावरून विजयपूर हे त्याचे नाव असावे असे दिसते. ‘विजयपूर’ या नावाचा उल्लेख चालुक्य राजा दुसरा जयसिंह (कार. १०१५-१०४३) याच्या इ. स. १०३६ व्या कोरीव लेखात तसेच नागचंद्रानी लिहिलेल्या इ. स. ११०० मधील मल्लिनाथपुराण या कन्नड चंपूकाव्यात आढळतात. त्यावरून इ.स. ११ व्या शतकात वा तत्पूर्वी विजयपूर हे नाव प्रचारात असावे. पुढे विजयपुर या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट वा संक्षिप्त रूप विजापूर झाले असावे.
आठव्या शतकापासून चौदाव्या शतकाअखेर विजापूरच्या विस्तीर्ण पट्ट्यात फारसे बांधकाम झाले नाही, मात्र आदिलशाही काळात इस्लामी वा मुस्लिम वास्तुकलेत मोलाची भर पडली
संरक्षणाच्या दृष्टीने यूसुफ आदिलखानाने आर्क नावाचा मातीचा किल्ला शहराच्या मध्यभागी बांधला. पहिल्या आदिलशाहने त्याभोवती सु. १० किमी. घेराची दगडी तटबंदी बांधली. त्याला ९६ बुरूज व सहा मोठे दरवाजे ठेवले. त्यांची नावेही अलीपूर, बहमनी, शहापूर, मक्का, फत्तेह अशी ऐतिहासिक ठेवण्यात आली. त्या दरवाज्यांच्या आत दुसरा दरवाजा अशी संरक्षणात्मक ववस्था करम्यात आली. दरवाज्यावर सज्जा आणि दोन्ही बाजूंस टेहळणीच्या दृष्टीने दोन वर्तुळाकार मनोरे बांधण्यात आले. या तटाभोवती सु. १२-१५ मीटर रूंदीचा खंदक खणण्यात आला. किल्ल्यात आसार महाल,आनंद महाल, आरसे महाल, चिनी महाल, सातमजली महाल, गगन महाल, मक्का मशीद, चिंदडी मशीद इ. खास इमारती होत्या. त्यांतील फारच थोड्या सुस्थितीत आहेत.
किल्लाच्या पडकोटात एक श्रीनृसिंहमंदिर असून ते जागृत स्थान मानले जाते. याशिवाय विजापूरमधील गोलघुमट, जुम्मा मशीद, ताजबावडी, अली रोझा, जोड घुमट,करीमुद्दीन मशीद, मलिक इ.मैदान तोफ, लांडाकसाब तोफ, चांदबावडी, इब्राहिम रोझा कबर मोती घुमट, अमिन दर्गा इ. वास्तु-वस्तु प्रसिद्ध असून त्यांपैकी जुम्मा अथवा जामी मशीद, इब्राहीम रोझा, गोलघुमट आणि मेहतर महाल या इमारती इस्लामी वास्तुकलेच्या प्रातिनिधिक असून यांव्यतिरिक्त विजापुरात अनेक लहान-मोठ्या तत्कालीन वास्तू आहेत.
जगप्रसिद्ध इमारत म्हणजे मुहम्मद आदिलशाहची कबर-गोलघुमट. तिचे चार स्वतंत्र भआग आहेत. कबर नगारखाना, मशीद आणि धर्मशाळा वा अतिथिगृह. नगरखान्यात अलीकडे वस्तुसंग्रहालय केले आहे. तिचे बांधकाम सु. ३३ वर्षे चालू होते. ह्या वास्तूचा आराखडा चौरस असून प्रत्येक बाजू ४३.५ मी. आहे आणि चारी कोपऱ्यांत अष्टकोनी सातमजली मनोरे आहेत. त्यांच्यावर लहान घुमट आहेत. संपूर्ण वास्तूची उंची सु. ६८ मी. असून तिचे क्षेत्रफळ सु. १, ७०३.५० चौ. मी. आहे. माथ्यावर मध्यभागी प्रचंड घुमट आहे घुमटाच्या खाली दालन असून या भव्य दालनाच्या सभोवती टोकेरी कमानी चौकटीच्या साच्यात शिस्तबद्ध बसविल्या आहेत. त्यामुळे वास्तूची लयबद्ध स्पष्टपणे जाणवते. त्यावर सभोवती सव्वातीन मीटरचा सज्जा असून तिथे उभे राहून बोलले असता १०-१२ प्रतिध्वनी उमटतात. या ठिकाणीच प्रतिध्वनींचा नाद चमत्कार अनुभवावयास मिळतो. म्हणून त्यास ‘बोल घुमट’ असेही म्हणतात. खालच्या दालनात चबुतऱ्यावर मुहम्मद आदिलशाह, त्याच्या दोन बेगमा, रंभावती (वारांगना), मुलगी व नातू थडगी आहेत. प्रत्यक्षात खरी थडगी या थडग्यांखाली आहेत. ह्या वास्तूत भव्यता आहे पण कुठेच कलाकुसर नाही. ती जगातील एक भव्य इमारत आहे.
मलिक-इ-मैदान व लांडाकसाब या दोन मोठ्या तोफा असून त्यांपैकी लांडाकसाब तोफ ५.३४ मी. लांब असून तिचे वजन ४९ टन असावे. मलिक-इ-मैदान सु. साडेचार मीटर लांबीची ओतीव तोफ मक्का व शहापूर दरवाजा यांमधील तटावर ठेवलेली आहे. तिला ‘मुलुख मैदान असेही म्हणतात.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment