Thursday, 29 March 2018

मालियाबाद किल्ला कर्नाटक Maliabad fort karnatak


मालियाबाद किल्ला कर्नाटक Maliabad Fort video

गाव :मालियाबाद , तालुका/जिल्हा :रायचूर, समुद्रसपाटीपासून उंची ४३०, प्रकार : गिरिदुर्ग/भुईकोट मिक्स
रायचूर पासून किमी वर मालियाबाद आहे, मालियाबाद मध्ये आलं कि गोशाळा विचारात जायचं.



गोशाळा हा किल्ल्यामध्येच वसली आहे.
मी आतापर्यंत पाहिलेल्या ४०० हुन अधिक किल्ल्यामधील सर्वात वेगळ्या धाटणीची अशी तटबंधी.



२१ फूट उंच तटबंधी फक्त लांब रुंद अश्या भल्यामोठ्या दगडांच्या बनवली आहे, म्हणजे विचार करा केवढे मोठे लांब रुंद दगड असती , तेवढे त्या आकारात कापून रचले कसे असणार?
इथे लहानातील लहान दगड 5' x 5' x १०' फुटाचा आहे तर मोठा १८ फूट लांब आहे.
किल्ल्याला आतून बाहेरून अश्या तटबंधी आहेत.




जवळपास 100 एकर मध्ये गड आहे, माथ्यवर शिव मंदिर,2 बुरुज आहेत, प्रवेशदार सुद्धा मथ्या दगडांच्या शिळा वापरून केलेला आहे.
थोडं अंतर चालो कि कपाशी च्या शेतामधून एक पुरातन मंदिर पडलं आहे समोर अखंड दगडात कोरलेले हत्ती आहेत. कलाकुसर हि शब्दत सांगू शकत नाही. गावात हनुमान मंदिर मूर्ती छान, वीरगळ आहेत, पुढं शिवमंदिर, नंदी, वीरगळ अप्रतिम आहे. महालक्ष्मी दगडात कोरलेली शिल्प छानच.




गडात गोशाळा आहे त्यामध्ये गोमूत्रापासून औषध बनवले जाते.






No comments:

Post a Comment