Tuesday, 20 March 2018

#बसवकल्यान किल्ला कर्नाटक



महाराष्ट्र
कर्नाटक सीमेपासून 7 किमी वर बिल्डर जिल्याहातील बसवकल्याण शहरात असलेला हा किल्ला अगोदर कल्याणा किल्ला म्हणून ओळखले जायचे. गाव आणि तालुका बसवकल्यान,जिल्हा बिदर.



इतिहासातील उल्लेख १० व्य शतकात जातो, कारण तेव्हा चालुक्या साम्राज्यातील राजधानी मान्यखेता वरून या कल्याणा किल्यात स्थानांतर झाली.
बसवकल्याण किल्ला हा अनेक सामाजिक सांस्कृतिक, जातीय उलाढाल पाहिलेला किल्ला आहे. बसवेश्वर महाराज , अक्का महादेवी यांची कर्मभूमी असणारा हा शहर किल्ला आहे.



समुद्र सपाटी पासून ५८० मीटर वर हा भुईकोट किल्ला शहरात नगरपालिका कार्यालय जवळच आहे.
किल्याच्या बाहेर पुरातन वस्तूचा ठेवा असणारे संग्रहालय आहे.




2 लाख लोकवस्ती असलेलं मराठी आणि कन्नड लोकांचं आपलं शहर, शहरात मध्य वस्तीत भुईकोट आहे.
किल्ल्याचे बांधकाम हे वाहण्यासाठी संरक्षणेच्या दृष्टीने बांधण्यात आलेले दिसून येते.
किल्ल्याला दरवाजे असून त्यातील हे आजमतीस चांगलं शाबूत आहेत. पहारेकरांच्या देवड्या हे दरवाज्यांना आहेत. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक होते , त्यातील अजून काही पाहता येतात .



मुख्य दरवाजा म्हणजेच "अखंड दरवाजा "हा माजली असून लाल दगडांनी बांधलेला आहे.
किल्ल्यामध्ये दुरावस्तेत असलेला राजमहालात दर्शनी भागातील रंगीत कलाकुसर आहे.
किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे परंतु आत कोणतीही मूर्ती नाही, मंदिर समोर एक छोटासा चोवकोनी तलाव आहे.
मंदिरामागे पश्चिमेकडे राणी महाल आहे, उत्तरेकडे दोन खोल विहिरी तर पश्चिमेकडे घोडे पाणी पिण्यासाठी जागा आहे. येथून पुढे एक अरुंद असे एक भुयार असून याचा वापर शत्रूंचा हल्ला झालं तर युद्धावेळी संकटकालीन पलायन मार्ग म्हणून होता. किल्ल्यामध्ये तालीम खानाहि होता



दोन तोफा असून एक खडक बिजली टोफू म्हणजेच sharp lightning cannon दुसऱ्या बुरुजावर आहे.
दुसरी तोफ हि एका चौवकोनी दक्षिणेकडील लढाई बुरुजावर आहे.



किल्ला प्रेक्षणीय असून शहरात परमपूज्य बसवराज महाराज यांचा 108 फूट उंच पुतळा, अक्का नागम्मा अशी एक गुफा देखील पाहता येते.

किल्ला हा महिन्याच्या दर दुसरा शनिवारी बंद असतो.


https://www.youtube.com/watch?v=-Ydj4GNX-9Q


#Trekkers _Journey


No comments:

Post a Comment