Saturday, 24 March 2018

चीन्माल्ला किल्ला कर्नाटक ಚಿನ್ಮಲ್ಲ Chinmalla Fort Karnatak

चीन्माल्ला किल्ला कर्नाटक ಚಿನ್ಮಲ್ಲ  Chinmalla Fort Video



गाव :चीन्माल्ला , तालुका अफजलपूर, कलबुर्गी, समुद्रसपाटीपासून उंची 365 मीटर, प्रकार : भुईकोट
कलबुर्गी पासून ५७ किमी वर तर जवारगी पासून ३३ किमी वर आहे एक १००० भर लोकसंख्येचं गाव चीन्माल्ला.
गावच ज्या गडात आहे असा चीन्माल्ला भुईकोट आहे,



भीमा नदीच्या काठी असणार या गावी जवारगी मार्गे जाण्यासाठी भीमा नदीचं अथांग पात्र ओलांडून जावं लागत, नजीकच्या काळात एक मोठा ब्रिज बांधला गेला होता परंतु काही महिन्यायुर्वी तो एका बाजून वाहून गेला.
गावात जाण्यासाठी थोडी पुलावरून कसरत करून उड्या मारून एका बाजूने जात येत.



 येथून अजून 3 किमी चालत चीन्माल्ला गाव, आमच्या नशिबाने आम्हाला एक दुचाकीस्वार मिळाला, गावात घेऊन जाण्याचं सुरवातीला १०० रुपये द्यावे लागतील असं गाडीवर बसल्यानंतर म्हणाला, परंतु गावात गेल्यानंतर इतर लोकांसमोर पैसे घेणे त्याला बरोबर वाटले नाही म्हणून नको बोलून निघून गेला.



चीन्माल्ला गाव हे किल्ल्यातच वसले आहे, कर्नाटक मधील घाणीने भरलेली गावे व त्यावर माजलेली डुकरे हे समीकरणच आहे.



किल्ल्याच प्रवेशद्वार सुसज्ज पण डुक्कर खाना झालाय, काही बुरुज शाबूत पण झाडी वाढली आहे, जंग्या प्रेक्षणीय, मराठेशाही बांधकाम शैली आहे, गावातील मल्लिकार्जुन मंदिर छान आहे.
 माहिती घेऊन परत एक दुचाकीस्वार कडे लिफ्ट (लिफ्टचे पैसे द्यावे लागतात इकडे) घेत नदीच्या ऐलतरी आलो. पैलतीरी जाण्यासाठी पुन्हा वाहून गेलेल्या पुलावरून उड्या मारत चालत गाडी कडे आलो.
#Trekkers_Journey

No comments:

Post a Comment