Thursday, 22 March 2018

गुलबर्गा किल्ला कर्नाटक Gulbarga Fort

गुलबर्गा किल्ला कर्नाटक  Gulbarga fort video



गाव तालुका जिल्हा कलबुर्गी, समुद्रसपाटीपासून उंची 472 मीटर, प्रकार : भुईकोट.
कलबुर्गी चा अर्थ कन्नड मध्ये कल म्हणजे दगड व बुर्गी म्हणजे किल्ला असं कलबुर्गी शहर, या शहरात ०.५ एकर व ३ किम च्या घेरा मध्ये आहे गुलबर्गा किल्ला .




किल्ल्याचा इतिहास ६ व्या शतकातील राष्ट्रकूट काळापर्यंत जातो, पुढे चालुक्यास २०० वर्ष आणि नंतर होयलास येथे राज्य केले. १४ व्या शतकाच्या सुरवातीला मुहंमद बिन तुगलक याने हे शहर काबीज केले.
इसवी सन १३४७ हा किल्ला राजा गुलचंद याने बांधला, पुढे गुलबर्गा बहामनी साम्राज्याची राजधानी झाली व सुलतान अल्लाउद्दीन बहामनी याने किल्याचा मोठे खंदक व भिंती बांधून विस्तार केला. काही ठिकाणी हा किल्ला उल-उद-दिन बहामनी याने दिल्ली सुलतानत सोबत दूर झाल्यानंतर बांधला असे म्हटले आहे.
१९४७ भारत स्वातंत्र्यानंतर हा किल्ला व शहर बेंगलोर च्या अधिकाराखाली गेला.





कृष्णा व भीमा या मोठ्या नद्या किल्ल्याच्या जवळून वाहतात म्हणून या भागात काळी माती आढळते.
प्रचंड मोठा असा हा किल्ला प्रेक्षणीय दुर्ग आहे.  दुहेरी तटबंद, जंग्या, बुरुज, चर्या, 2 दरवाजे , 30 फुटी 1 तोफ,15 फुटी 3 तोफा,74 एकर मध्ये आहे. किल्ल्याला १५ उंच बुरुज असून २६ बंदुका आहेत.




किल्ल्यामध्ये आशिया खंडातील 2री मोठी जामा मस्जिद आहे, शहरातील बुद्ध मंदिर प्रेक्षणीय आहे.



गुलबर्गा किल्ला पाहताना मोठी तोफ पाहायला विचारू नका,
पंच धातूची बनवलेली बारा गजी तोफ हि २९ फूट लांबीला , ७.६ फूट घेरा , गोलाकार २ फूट व जाडीला ७ इंच आहे.







#Trekkers_Journey

No comments:

Post a Comment