शहापूर किल्ला कर्नाटक
गाव/तालुका : शहापूर, जिल्हा : यादगिर,समुद्रसपाटीपासून उंची 850 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग
शहापूर किल्ला ९५० ते ११५० मध्ये बांधला गेला होता. शहापूर किल्ला २ भागामध्ये विभागाला गेलेलं असून पूर्व व पश्चिम किल्ला असे हे दोन अलग अलग डोंगरांवर हे किल्ले आहेत. दोन्ही डोंगरांवर मोठी तटबंधी आहे.
कर्नाटक मधील सर्वात मोठे किल्ले यांच्या यादी मध्ये हा किल्ला येतो.
पश्चिमेकडील किल्ला रस्त्यावर आपल्याला सिद्धलिंगेश्वर मंदिर , हजरत सैय्यद सालार मसूद गाझी दरगाह दिसून येतो. तर पश्चिमेकडील पायथ्याला हाथी मोट म्हणजेच Elephant Tank आहे. वरती हनुमान मंदिर व मंदिरासमोरील मंदाकिनी तलाव पाहण्यासारखं आहे.
पूर्वेकडील किल्ल्यावर किल्ल्याचे खूप सारे अवशेष पाहावयास मिळतात, किल्ल्याच मोठे व एकामागोमाग एक असे अनेक वर चढत जाणारे दरवाजे प्रवेशद्वार, तटबंधी , बुरुज , सैनिकी छावणी ,जेल असे अनेक अवशेष.
किल्ल्याला प्रमुख ७ दरवाजे व 7 छोटे दरवाजे आहेत.
किल्ल्यामध्ये ७ मोठ्या तोफा आहेत
किल्ल्याच्या मागे डोंगराचा मध्ये तावरे केरी म्हणजेच Lotus Lake आहे.
अफाट असा या किल्ला विस्तार 100 एकर मध्ये गिरिदुर्ग आहे,१/१.5 तास चढाई, 14 दरवाजे आहेत सुसज्ज, शिलालेख, 7 तोफ,15 ते 20 इमारती,6 बांधीव मोठे हौद, जंग्या चर्या तर अफलातून आहेत, चापेटदान मारुती मंदिर,५/6 तास लागतात भटकंती साठी, खूपच सुंदर आणि 2 विभागात गड आहे,1 दोन्ही बाजूला दरी आहे, सुंदर, पायथयला तलाव, गावात महादरवाजा त्यावर शिलालेख, गड अप्रतिम फार मोठा आणि अतिशय सुंदर आहे.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment