Wednesday, 21 March 2018

चेंगटा किल्ला कर्नाटक chengata fort karnatak

चेंगटा किल्ला कर्नाटक  Chengata fort video




कर्नाटक मधील हुमनाबाद तालुक्यामध्ये असणारे चेंगटा गाव नेमकं काही दिवसापूर्वीच कमलापूर तालुका मध्ये गेलं .शहरात जरी तालुका माहित नसाल तरीही चालत परंतु जर अश्या ग्रामीण भागात गेलं कि गाव शोधताना तो कोणत्या तालुक्या मध्ये येतो हे माहित असणे गरजेचे आहे.




कमलापूर पासून १५ किमी वर असणारे चेंगटा गाव तस मराठयांचं .गावात शिवकाळपासून चव्हाण, कदम, माने, शिर्के अशी सरदार मंडळी राहतात.



चेंगटा किल्ला हा सध्या एक धनाढ्य वक्ती घशात घालू पाहत आहे, त्याची तशी कोर्ट मध्ये केस हि चालू आहे.
परंतु त्याच परिणाम सध्या किल्ला सोसतो आहे कारण कोर्ट प्रकरण असल्याने किल्ला कडे दुर्लक्ष होत आहे.
गावातील मराठी असलेला व महत्वाचे म्हणजे मराठी बोलणारा (हल्ली मराठी बोलणारे तसे महाराष्ट्रात कमीच भेटतात व तेपण जर दुस्र्या राज्यात भेटला तर नावालाच नाही का ?) उमदा सरपंच लोकेश चव्हाण भेटला, मग लोकेश ने काय संपूर्ण इतिहास आणि माहिती इतंभूत सांगितली.




सध्या किल्ल्याची अवस्था वाईट असून 4 पडलेले बुरुज,2 भग्न दरवाजे, किल्ल्यामध्ये आहि इमारतींचे अवशेष आहेत परंतु किल्ला आता हागणदारी झाल आहे.
किल्ल्यापासून जवळच पुरातन शिवमंदिर आहे जे मुघलांनी तोडले होते. छप्पर नवीन आहे परंतु बाकी अवशेष जुनेच आहेत.




किल्ल्या पासून ४ /५ घरे सोडली कि शिव मंदिर जवळच लोकेशच घर आहे, किल्ल्याला भेट देताना आवर्जून  लोकेशला भेटा.

#Trekker_Journey

No comments:

Post a Comment