कर्नाटक मधील सेदाम हा तालुका आहे, सेदाम रेल्वे स्टेशन पासून २ किमी वर बडी मज्जीद म्हणजेच मदिना मज्जीद मागे हा किल्ला आहे. गाव आणि तालुका सेदाम,जिल्हा कलबुर्गी, समुद्रसपाटीपासून उंची 405 मीटर.
आता किल्ला म्हणून कोणी ओळखत नाही परंतु गढी म्हणून बोलले तर सांगतात.
मजीद हे किल्ल्याच्या भागात येते, ती आता मोठी केलेली असावी असे दिसून येते.
सेदाम पूर्वीच्या काळी हेडिंबा म्हणून ओळखले जायचे. व राष्ट्रकूट आणि कल्याणी चालुक्यांस यांनी यावर राज्य केले होते. सेदाम मध्ये राष्ट्रकूट काळातील जैन केव्ह सुद्धा आता नष्ट होत जाण्याच्या मार्गावर आहे.
जुने हिंदू मंदिर खांब आढळतात बहुतेक ते आता गायब करतील कारण बाकी अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व मजीद मोठी होत पसरत चालली आहे.
किल्ल्याची 2 मजली इमारत आहे, पण पार डुक्कर खाना झालाय, आतमध्ये 2 घरे आहेत 1 एकर मध्ये भुईकोट आहे.
सेदाम हे बांधकामासाठी लागणारे शहाबादी दगडासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, इथे या दगडाच्या खाणी आहेत.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment