गाव : क्यादिगेरा,तालुका देवदुर्ग, जिल्हा रायचूर, समुद्रसपाटीपासून उंची ५३०, प्रकार : गिरिदुर्ग.
रायचूर पासून ४९ किमी वर एक छोटासा गाव आहे क्यादिगेरा. लमाणी लोकांचे तांडे गावाबाहेर आहेत.
क्यादिगेरा चा काही इतिहास माहिती नसला तरीही हा किल्ला शोरापूर राज्याचा भाग होता.
किल्ला गावाच्या पश्चिमेला टेकडीवर आहे , गावातून 10 मिनिट चढाई, पायथयला मस्जिद, माथ्यवर 1 खोली वजा बांधकाम, मूर्ती, दरवाजा म्हणून कमान आहे,2 बुरुज, तटबंदी थोडी थोडी आहे.
बाकी घरांचे अवशेष खूप आहेत, आटोपशीर माथा आहे.
आम्ही गद उतरून आलो व गावातील एका लग्नाची वरात चालली होती, रस्ता छोटा असल्याने वरात जाईपर्यंत थांबावे लागले पण एक लग्न वरात पाहता आली.
@Trekkers_Journey
No comments:
Post a Comment