Saturday, 24 March 2018

गोब्बेरवाडगी किल्ला कर्नाटक Gobberwadgi Fort karnatak

गोब्बेरवाडगी किल्ला कर्नाटक Gobberwadgi fort



गाव :गोब्बेरवाडगी अलूर , तालुका : जवरगी, जिल्हा : कलबुर्गी,
समुद्रसपाटीपासून उंची 423 मीटर, प्रकार : भुईकोट

इजेरी किल्ला पाहिल्यानंतर पुढचा किल्ला अलूर होता , त्याप्रमाणे इजेरी पासून १२ किमी वर अलूर गाठले.
अलूर मध्ये चौकशी करता तिथे कोणताही किल्ला नाहीये असे समजले. इकडे तिकडे खूप माहिती काढताना नाकी नऊ आले, किल्ला गढी कोटा गढीमा कोटे असे सर्व शब्द वापरून झाले, शेवटी बुरुज, किल्ले, तटबंधी असे एक ना अनेक फोटो दाखवून असं काही आहे का अलूर मध्ये हे विचारानं झाल. शेवटी एकलकोंडा असा फुटका बुरुजाचा फोटो पाहून एक दुचाकीस्वार ने भर दुपारी कडक उन्हात आशेचा (गरम का होईना पण) किरण दाखवला, " आपको ऐसा अलूर मी कुछ नाही पार  गोब्बेरवाडगी मे देखनेको मिलेगा"
म्हणजे अलूर मध्ये नाही तर अलूर गावातून जाताना पुढे 6 किमी वर गोब्बेरवाडगी वर काही पाहायला मिळेल तर.




गोब्बेरवाडगी एक छोटासा ७५० लोकसंख्येचं गाव, गावात कोटा म्हणून ओळखतात
गावात शेवाटी एक एकमेव बुरुज शिल्लक आहे, अंदाजे 40 फूट असेल, मराठेशाही बांधकाम शैली, जंग्या आहेत एक खिडकी यावतिरिक्त काहीच नाही, गावात हनुमान मंदिर आहे, भुईकोट पूर्ण नामशेष झाला आहे, बुरुज सुद्धा अखेरीस आला आहे.


Trekkers Journey

No comments:

Post a Comment