गाव/तालुका शूरपूर, जिल्हा यादगिर, समुद्रसपाटीपासून उंची 400 मीटर,प्रकार :गिरिदुर्ग/भुईकोट/पॅलेस.
शोरापूर ला सुरपूर म्हणूनही ओळखले जाते. सुरपुरावर नायक यांनी १६३९ ते १८५७ पर्यंत राज्य केलं, सुरपूर हे मुख्यालय होत तर वागनगिरे त्यांचं राजधानीच केंद्र होत.
वागनगिरीच्या युद्धानंतर तो किल्ला उद्धवस्त झाल्यामुळे नायिकांनी सुरपूर येथे राजधानी उभारली व २ नवीन राजवाडे बांधले. त्यातील एकाला "राज दरबार" स्थानिक बोलतात.
राजा वेंकटप्पा नायक हे शेवटचे राजा होते, ज्यांनी सर्वात अगोदर इंग्रजांना आपल्या राज्यात हस्तक्षेप करण्यास विरोध केला.
१७२६ ते १८९३ मध्ये राजा पितामभऱा बैरी पिद्दा नायक याच्या कालावधी मध्ये स्वामी वेणुगोपाल मंदिर बांधले गेले. मंदिरासमोर एक मोठं तलाव आहे.
तसेच मंदिरामागील टेकडीवर बुरुज आहे व या सर्वात उंच ठिकाणी 510 मीटर वर १८४४ मधील "टेलर मंझिल" एक उंच इमारत देखील आहे.
गावात सुंदर असा हा भुईकोट आहे, शेजारी शाळा प्रवेशद्वार देखणं, शिलालेख आहे, पॅलेस मध्ये सुंदर तैलचित्रे, तलवारी, फोटो अतिप्राचीन आहेत,
लाकडी कोरीव काम सुंदर, 3 मजली भुईकोट आहे,
लाकडी कोरीव काम सुंदर, 3 मजली भुईकोट आहे,
2 लाख लोकसंख्या आहे, मराठी माणसे खूप आहेत त्यात साळुंके, पवार, इंदुलकर, जाधव, माने, गायकवाड अशी आहेत.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment