रायचूर किल्ला कर्नाटक ರಾಯಚೂರು ಕೋಟೆ
गाव/तालुका/जिल्हा : रायचूर, समुद्रसपाटीपासून उंची 490 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग.
रायचूर हे एक मोठं शहर आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्टॅन्ड च्या समोर व कबरस्थानच्या पुढे उभा ठाकला आहे हा रायचूरचा गिरिदुर्ग,
रायचूर परिसर अनेक राजवटीने राज्य केलेला आहे, काकटिया कामा, मुसुनरी कामा,राष्ट्रकूट , विजयनगर साम्रज्य, बहामनी , निझाम व या सर्व राजवटींचं चढ उताराचा रायचूर किल्ला साक्षीदार होता.
रायचूर किल्ला बदामी चालुक्य पासून अस्तित्वात आहे, चालुक्य कल्याणी राजवटी मध्ये किल्ला पुंनावनिर्माण केलं. गेलं.
पश्चिमेकडील भिंतीवर असणाऱ्या शिलालेखानुसार हा किल्ला शक १२१६ मध्ये काकटियाच्या राणी रुद्रमा देवी यांच्या अधिकाराने व राजा गोरे रंगा रद्दीवरु सूचनेने, सैनिक प्रमुख राजा विठ्ठलायाने बांधला.
पुढे शक १२९४ मध्ये वारंगलच्या काकटियानी किल्ला मजबूत केला.
कबरस्थान जवळ गाडी लावून दगडावर असलेल्या कोरीव पायर्यांनी गड चढाई सुरुवात केली.
पश्चिमेकडून 1 मस्जिद आहे, पुढे अभेद्य तटबंदी दिसते, वर अवाढव्य दगड आपल्याला दिसून येतात याच दगडमडे आहे किल्ल्याचा पश्चिमेकडील दरवाजा.
मोठे दगडांचा वापर पुरेपूर करून ते तसेच ठेऊन दोन दगडांच्या मधल्या जागेतून रस्ता आहे. इथे वर एक बुरुज आहे.
तटबंधी वरून चालत आपण पुढे जातो तरी या मोठ्या दगडावरून नजर काही हटत नाही. डावीकडे हे दगड तर उजवीकडे गडाखाली मोठं प्रेक्षणीय "आम तलाव ".
चालत आपण गडाच्या पूर्वेकडील बुरुजाकडे पोहोचतो. येथून पुन्हा मोठ्या दगडाच्या वाटेने आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वरूनच नैसर्गिक दगडी थोडं बांधीव दरवाजा मधून 15 मिनिट गडावर पोहोचायला लागतात.
गडमाथ्यावर इमारतींचे व बुरुजाचे अवशेष दिसून येतात, गडमाथा आटोपशीर आहे. माथ्यावर एक इमारतीचा बाजूला जरोखा आहे, हवा छान लागते. इथे एक मोठी तोफ दिसून येते.
किल्ल्याला एकूण 4 दरवाजे असून त्यांची नावे, नवरंग दरवाजा, काटी दरवाजा व मेक्का दरवाजा, खंदक दरवाजा असे आहेत. १ मज्जीद व २ दर्गाह आहेत, खंदक दरवाजाच्या मागे "टाकीवाले बाबा" दर्गाह आहे.
किल्ला व परिसर स्वच्छ आहे. तसेच शहरांमध्येही काही वाडे व दरवाजे अवशेषरुपी पाहण्यास मिळतात.
किल्ल्यावरून पूर्ण रायचूर शहर दिसते, पश्चिमेकडे रायचूर बस स्टॅन्ड तर पूर्व उत्तरेकडे रायचूर ताव म्हणजेच आम तालाब प्रेक्षणीय आहे.
No comments:
Post a Comment