यादगिर किल्ला कर्नाटक
गाव/तालुका/जिल्हा:यादगिर, समुद्रसपाटीपासूनउंची 702 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग
कर्नाटक मधील गिरिदुर्गांमधील एक मोठा किल्ला. कर्नाटकमधील डोंगर हे मोठे दगडाचे डोंगर व चढउतार असलेले डोंगर आहेत , या दगडांचा पुरेपूर उपयोग करून किल्ल्यांचे बुर्ज व तटबंधी बांधणी गेली.
यादगिर किल्ल्यावरती अनेक साम्राजानी राज्य केलं, त्यात प्रामुख्याने कल्याण चालुक्यस, यादव , छोलास , बहामनी सुलतान ,आदिलशाही व नंतर निझाम होते .
किल्ल्याच्या परिसरात विविध कालखंड सांगणारे ५ शिलालेख सापडले आहेत.
त्यात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी सापडणार शिलालेख नुसार हा किल्ला शहापूर तालुक्यातील सागर या गावातील "जग्गनाथ" याने बांधला.
यादगिर किल्ला हा कल्याणी चालुक्य मध्ये बांधला गेला , यादव साम्राज्य मध्ये या किल्ल्यला मजबूत बनवले गेले व पुढे मुस्लिम राजवटी मध्ये या किल्ल्याचा विस्तार झाला.
असा हा यादगिर किल्ला शहराच्या बरोबर मध्ये आहे, शहर गोलाकार आहे, पायरी मार्ग ने महाकाय दरवाजा गाठला, मोठा दरवाजा, तसेच पुढे अजून 4 दरवाजे, तटबंदी, जंग्या, चर्या, तुफानी आहेत, पण पायथ्याचे लोक दरवाजा व परिसर हागणदारी म्हणून वापरतात, चीड येते पण काय करू शकत नाही.
गडावर सर्व दिशेला मिळून 13 अजस्त्र तोफा आहेत, तिहेरी तटबंदी, पश्चिम दरवाजा, उघड्यावर मारुती मूर्ती, 2 मंदिर, सदर, पाण्याचे बांधीव हौद मस्त, किल्ल्यामध्ये रामलिंगेश्वर व भवानी माता असे २ मंदिर आहेत.
अनेक बुरुजांवरती तोफा , अक्का व तंगी बावी अश्या जुळ्या विहिरी व पुढे किल्ल्याच सर्वोच्य ठिकाण निशाणी बुरुज आहे.
वरून शहर छान दिसते विशेषतः शहरातील "बडा तालाब" तलाव. संपूर्ण गडफेरी ला 2 तास लागतात.
Trekkers Journey
No comments:
Post a Comment