कर्नाटकातील बिदर जिल्ह्तात ६ प्रमुख किल्लमधील आवर्जून पाहावा असा भातांबरा भुईकोट किल्ला.
भालकी रेल्वे स्टेशन पासून १० किमी वर भातांबरा गाव आहे याच गावाबाहेर दुर्लक्षित असा भातांबरा किल्ला काळ्या दगडापासून बनवला गेला आहे. समुद्र सपाटीपासून ५७१ मीटर उंची.
गावात मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवाय जागोजागी भगवे झेंडे दिसून येतात.
प्रवेशद्वार हे फसवे आहे , चोरदरवाजा सारखं एक छोड द्वार आपल्याला किल्ल्यामध्ये घेऊन जात.
किल्ल्याबाहेर २ तटबंधी वतसेच किल्ल्याला सर्व बाजूनी खंदक आहेत.
किल्ल्याचा ३ मंजीली टॉवर वर कर्नाटकी शैलीतील नक्षीकाम दिसून येते.
किल्ल्याच्या मुख्य इमारतीला ७ बुरुज आजही उत्तम शाबूत आहेत . तसेच बाहेरील तटबंदीला असणारे बुरुज हे ढासळलेले व मातीत गेलेले दिसून येतात.
उत्तम बुरुज, पहारेकरांच्या देवड्या, उत्तम प्रवेशद्वार इमारत, किल्ल्यामध्ये असेलेले हौद, इमारतीचे अवशेष, तिसऱ्या मजल्यावर अरुंद पायर्यांनी जाण्याची वाट व वरून दिसणारे किल्ल्याचे अप्रतिम रूप पाहण्यासारखे आहे.
#Trekkers_Journey
Bhatambara fort Videos
No comments:
Post a Comment