वागनगिरी किल्ला कर्नाटक
गाव वागनगिरी,तालुका शोरापूर, जिल्हा यादगिर, समुद्रसपाटीपासून उंची 510 मीटर, प्रकार:गिरिदुर्ग.
विजापूर पासून १३७ किमी तर कलबुर्गी पासून ११८ किमी वर वागनगिरी किल्ला आहे.
मुघल व रामोशी यांच्या लढाईचा साक्षीदार, १७०४ साली रामोशी पेड्डा पीदिया नायक सोबत ९००० रामोशी विरुद्ध झुल्फिकार खान चे ४०००० मुघल यांच्या झालेल्या लढाईचा केंद्र असा हा बलाढ्य वागनगिरीचा किल्ला.
मुघलांनी केलेल्या हल्ल्याचा ५ पट कमी संख्येने असून पण केलेला ३ महिने प्रतिकार.
परंतु किल्ल्याचा काही भाग मुघलांनी काबीज केल्यानंतर रामोशी नायकाने त्याच्या माणसांना जेवढं जमेल तेवढं व हाती लागेल तेवढं
पैसा सोन घेऊन बायका मुलांसोबत किल्ला सोडण्यास सांगितले.व संकटकालीन मार्गाने ते मराठ्यांना जाऊन आश्रयास मिळाले.
मुघल सैन्य जेव्हा किल्ल्यामध्ये गेले तेव्हा त्यांचा हातही काहीच नाही लागले फक्त म्हातारे व अपंग लोक जे पळून जाऊ शकत नव्हते असे.
मुघलांनी नंतर वागनगिरी किल्ल्याचे नामकरण "रहमान बक्ष किल्ला" अस्से केले होते.
वागनगिरीचा हा किल्ला प्रचंड महाकाय गिरिदुर्ग आहे, 3 विभागात विभागलेला असून ३ टेकड्यांवर वसलेला आहे. गावातून वाटाड्या घेऊन आम्ही पूर्वेकडील सुरुवात केली होता, पूर्वेकडील टेकडीवर 2 बुरुज, शाळा, पाण्याची नव्याने बांधलेले टाकी आहे, मग खाली येऊन मधल्या गडावर कूच केली, पायरी मार्ग आहे,सुसज्ज दरवाजा, तटबंदी प्रेक्षणीय, जंग्या, चर्या देखण्या, सदर आहे, मुर्त्या आहेत, 1 गुहा तलाव छान दिसतो मस्तच आहे मग तसेच दुसऱ्या दरवाजातून मुख्य गडावर प्रवेश केला, अभेद्य दरवाजा,कोरीव शिल्प, शिलालेख आहे, तटबंदी प्रेक्षणीय आहे, जंग्या बुरुज सुंदर, तसच पाहत खाली पडकोटी गावात उतरलो.
छत्रपती शिवाजी महाराज बोर्ड, सुस्थितीत असलेला दरवाजा व त्यावर महाराजांचा चित्र असलेला भगवा फडकत आहे.
बुरुज, तटबंदी देखणी आहे, गावात सुद्धा 1 दरवाजा, जुनी घरे आहेत सुंदर परिसर, शिवकालीन बांधीव तलाव देखणा आहे, अप्रतिम गिरिदुर्ग आहे
Trekkers Journey
No comments:
Post a Comment