वनदुर्ग किल्ला कर्नाटक
गाव : वनदुर्ग, तालुका शहापूर, जिल्हा यादगिर, समुद्रसपाटीपासून उंची 462 मीटर, प्रकार : भुईकोट.
शोरपूर व शहापूर या २ तालुक्यांच्या मध्ये असणारा वनदुर्ग किल्ला, शहापूर पासून गोगी मार्गे २५ किमी तर शोरपूर असून १८ किमी वर हा किल्ला आहे.
शोरपूरच्या नायक साम्राज्याचे कृष्णप्पा नायक यांनी हा वनदुर्ग किल्ला बांधला.
त्यावेळी हा किल्ला सर्व बाजूने जंगलाने वनाने भरलेला म्हणून किल्ल्याला नाव वनदुर्ग दिले गेले होते. आत जरी जंगले नसली तरी किल्ला त्या नावाने आहे. किल्ल्यामध्ये शेती होते आता.
बांधकाम शैली अफलातून आहे, किल्ल्याला खंदक ३० फूट लांब तर १२ फूट खोल आहेत. या खडकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे खंदक सर्व ऋतूमध्ये, पूर्ण पाण्याने भरलेले असायचे , आताही काही ठिकाणी राहिलेल्या खंदक मध्ये पाणी दिसून येत.
किल्ल्याचा प्रवेशद्वार हा फसवा आहे , किल्याला प्रवेशदवरापुढे आयताकृती बांधकाम असून आत मध्ये पहारेकरांच्या देवड्या आहेत, जेणेकरून शत्रू त्याकडे फसून जाईल.
किल्ल्याला आतमधील दुसरी एक तटबंधी आहे, त्यामध्ये अनेक इमारती दिसून येतात.
किल्ल्यामध्ये सध्या ५ घरे व एक हनुमान मंदिर आहे. हनुमान मूर्ती खूपच सुंदर आहे.
अफलातून अश्या या भुईकोटाला, दुहेरी तटबंदी, खंदक अजूनही पाणी आहे,3 अप्रतिम दरवाजे, शिल्प, दिवड्या उंच खंदक मुळे, देखण्या आहेत,एक शिलालेख आहे, तटबंदी प्रेक्षणीय आहे, जंग्या, चर्या सुंदर,20 एकर मध्ये फोर्ट आहे,12 खखणीत बुरुज,2 बांधकाम अवशेष, शेती आहे.
#Trekkers_Journey
No comments:
Post a Comment